breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

महेंद्र सिंग धोनीने २०२४ मध्येही खेळणार असल्याचे दिले संकेत; म्हणाला,..

IPL2023 : आयपीएलचा १६ वा हंगाम सुरू आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा हा अखेरचा आयपीएल हंगाम असल्याचे संकेत मिळाल्याने त्याचे चाहते प्रत्येक सामन्यासाठी स्टेडिअमवर गर्दी करत आहेत. दरम्यान, धोनीने आपण २०२४ मध्येही खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

नाणेफेकीनंतर डॅनी मॉरिसन याने धोनीला विचारले की, आयपीएलचा अखेरचा हंगाम एन्जॉय करतोय ना? त्यावर धोनीने आपल्या खास शौलीत उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, ही माझी अखेरची आयपीएल स्पर्धा आहे, हे तुम्ही ठरवलं आहे…मी नाही..यावर धोनी पुढच्या वर्षी देखील कमबॅक करेल असं म्हटलं जात आहे.

डॅनी मॉरिसन आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यातीलल वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा कमबॅक करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button