breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेते आणि दिग्दर्शक मनोबाला यांचे निधन

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेते मनोबाला यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ६९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी होते, अशी माहीती आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

दिग्गज अभिनेते मनोबाला यांच्या निधनाबद्दल चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्तींनी ट्विटरवर शोक व्यक्त केला. मनोबाला हे मागील अनेक दिवसांपासून खासगी रुग्णालयात दाखल होते. जानेवारी महिन्यामध्ये त्यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. तसेच मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.

अभिनेते मनोबाला यांनी चंद्रमुखी, गजनी, सिंघम, कांचना, भवानी, लिंगा, गुनगुन, राज्यराणी आदी चित्रपटांमध्येदेखील काम केले. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही काम केले. मनोबाला यांनी आपल्या करिअरमध्ये एकुण २४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

दरम्यान १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला मनोबाला यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. १९७९ मध्ये आलेल्या पुथिया वरपुगल यांच्या चित्रपटात ते सहदिग्दर्शक म्हणून पुढे आले होते. यानंतर त्यांनी कॉमेडियन म्हणून अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या कॉमेडीचा टायमिंग अतिशय अचूक असल्याने ते विनोदी भूमिका करण्यासाठी खूपच लोकप्रिय झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button