Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

यशवंतरावांचे स्मृतीस्थळअन् कराडशी ॠणानुबंध; अजित पवारांचा यशवंतरावांना श्रद्धांजलीचा शिरस्ता

कराड : माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या कराडच्या प्रीतिसंगमावरील स्मृतीस्थळाशी अजित पवार यांचा ॠणानुबंध जुळला होता. ज्येष्ठ्नेते शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांना राजकीय गुरु मानत असल्याने त्यांच्या जयंती व स्मृतीदिनी कराडमध्ये त्यांच्या समाधीस पुष्पांजली वाहण्यास ते आवर्जून हजर राहत असत. पण, त्यात अलीकडे प्रकृतीच्या कारणास्तव अनेकदा खंड पडला. परंतु, काकांची ही परंपरा अजित पवारांनी कायम जोपासली.

यशवंतरावांच्या २५ नोव्हेंबर या पुण्यतिथीदिनी अजित पवार आपल्या सहकाऱ्यांसमवेत अगदी सकाळी चव्हाणसाहेबांच्या समाधीला पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण करणार हे निश्चित असायचे. शिवरायांची राजधानी असलेला सातारा आणि देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचलेल्या सुसंस्कृत राजकारणी अशी ख्याती असलेल्या यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून पवार परिवाराचे या भूमीशी वैचारिक, राजकीय व भावनिक नाते जोडले गेलेले आहे. येथील जनतेनेही त्यांना भक्कम ताकद दिल्याने पवार आणि सातारा, कराड असा जिव्हाळ्याचा त्रिवेणी संगम बनला आहे.

महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश आणणारे आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले यशवंतराव चव्हाण यांच्या सुसंस्कृत विचारांचा वारसा आपल्याकडे असल्याची ठामपणे ग्वाही देणारे अजित पवार यांचा यशवंतरावांचा स्मृतिदिन असो वा, कराडचा सोयीचा दौरा असो. यावेळी ते वेळात वेळ काढून यशवंतराव चव्हाणांच्या  स्मृतीस्थळी अभिवादन व त्यांचे स्मरण करण्यासाठी येत असत. त्यावेळी यशवंतविचारांची आपल्या नजरेतील मांडणी करून, त्या अनुषंगाने आपली सत्तेच्या माध्यमातून कशी वाटचाल आहे, हेही ते माध्यमांसमोर आवर्जून सांगत असत.

हेही वाचा – ‘डीजीसीए’, ‘एएआयबी’ पथकांकडून तपासणी… ब्लॅक बॉक्स, विमानांचे तुकडे

अनेकदा ते वेळ काढून यशवंतरावांचे निवासस्थान विरंगुळा व वेणूताई चव्हाण स्मारक सभागृहासही सहकारी मंत्रीगण आणि प्रशासनासमवेत भेट देत असत. यशवंतरावांचे स्मृतीस्थळ, विरंगुळा निवासस्थान व वेणूताई चव्हाण स्मारक सभागृहाची व्यवस्था जाणून घेवून  त्याबाबत ते तेथील विश्वस्त व प्रशासनासमोर आपली मते मांडत. तेथील पावित्र्य, स्वच्छता, नीटनेटकेपणा, सुशोभीकरण याबाबत कटाक्षाने सुचनाही करत असत. यशवंतराव चव्हाण यांचे २०१३ हे जन्मशताब्दीचे वर्ष असल्याने, त्याचे औचित्य साधून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी केली असता, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवारांनी या जन्मशताब्दीसाठी शंभर कोटींचा निधी लगेचच देऊ केला होता.

आत्मक्लेश उपोषणाची आठवणएका जाहीर सभेत बोलताना धरणातील पाण्याच्या तुटवड्यावरून अनावधानाने अजित पवार हे अपशब्द बोलून गेल्यानंतर त्याचे महाराष्ट्रभर पडसाद उमटले. यावर मी यशवंतविचारांचा पाईक असताना, ही चूक झाल्याचे प्रायश्चित म्हणून त्यांनी अचानक कराडमध्ये दाखल होत ७ एप्रिल २०१३ रोजी चव्हाणांच्या समाधीसमोर आत्मक्लेश म्हणून दिवसभर उपोषण केले होते. या वेळी त्यांनी समाधीस्थळी नतमस्तक होत आपले आदर्श असलेल्या यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली होती. आज अजित पवार यांचे निधन होताच या आत्मक्लेश उपोषणाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button