ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा मुंबई–चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक

विकलांग डब्यात बसलेल्या एका प्रवाशाला किरकोळ जखम, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

महाराष्ट्र : सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना ताजी असतानाच आता अज्ञात इसमांकडून पुन्हा मुंबई – चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या दहा दिवसांत दोन वेळा रेल्वेवर दगडफेक झाल्याने रेल्वे प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेल्या एका प्रवाशाला किरकोळ जखम झाली आहे. त्याच्यावर तात्काळ प्रथमोपचार देण्यात आले. मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं?
गाडी क्रमांक २२१५९ या मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर सोलापुरातील वाशिंबे ते पारेवाडी रेल्वे स्थानकादम्यान दगडफेक करण्यात आली. वाशिंबे ते पारेवाडी रेल्वे स्थानकादरम्यान काही अज्ञात व्यक्तीने एक्सप्रेसवर दगडफेक केली. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. या दगडफेकीत गाडीची काच फुटली आहे. तसेच एका प्रवाशाला दुखापत झाली आहे. अनिकेत लहामुने असे या प्रवाशाचे नाव आहे. तो धाराशिव उपळा तालुक्यातील रहिवाशी आहे. यात इतर कुणी गंभीर जखमी झालेले नाही.

पण या घटनेमुळे रेल्वेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दगडफेकीमुळे या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. या संदर्भात पुणे नियंत्रण कक्षाकडे ऑनलाईन तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती लहामुने यांनी दिली आहे. अनिकेत लहामुने हा पुणे ते कुर्डूवाडी असा प्रवास करत होता. या घटनेमुळे रेल्वेच्या काचा फुटल्या असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सोलापूर लोहमार्ग पोलीस करत आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसवर अशाच प्रकारे अज्ञातांनी दगडफेक केली होती. गुरुवारी (२ जानेवारी) रोजी रात्री ९.२०दरम्यान ही घटना घडली होती. जेऊर-कुईवाडी सेक्शनमध्ये भाळवनी नजीक वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली होती. गेल्या दहा दिवसात दुसऱ्यांदा रेल्वेववर दगडफेक झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button