Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

एसटी कर्मचाऱ्यांना भोजनभत्ता देण्यात यावा, अनिल परब यांचे निर्देश

मुंबई – बेस्ट च्या सेवेत असलेल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार दररोजच्या दररोज भोजनभत्ता देण्यात यावा असे निर्देश परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिले आहे. गेली दोन महिने एक हजार बसेससाठी ४५०० पेक्षा अधिक एसटी कर्मचारी मुंबईतील बेस्ट वाहतूकीच्या सेवेत आहेत. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था एका खाजगी संस्थेला देण्यात आली होती.

कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ व संबंधित कंपनीकडून जेवण पुरवण्याची वेळ यामध्ये तफावत असल्याने जेवणाबाबतच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्याबाबत अनेक तक्रारी कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्याकडे केल्या होत्या याची गंभीर दखल घेऊन सदर खाजगी कंपनीचे जेवणाचे कंत्राट तातडीने रद्द करुन सर्व कर्मचाऱ्यांना दररोज रोखीने भोजनभत्ता देण्यात यावा, असे निर्देश मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button