Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“त्यांनी मांडलेला विचार महत्वाचा…”; ठाकरेंच्या मुद्द्याला ‘शिंदे’ची साथ !

मुंबई : रविवारी मनसेचा गुढीपाडवा मेळावा शिवतीर्थावर पार पडला. यामध्ये राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये विविध मुद्द्यांना हात घातला. यामध्ये मुंबईतील नद्यांपासून महाकुंभ मेळ्यापर्यंत विविध विषयांवर चौफेर फटकेबाजी केली.ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये वृक्षतोड हा मुद्दा देखील उपस्थित केला. याच मुद्द्याला धरून पर्यावरण प्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील आपला पाठिंबा दर्शविला.

ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्वच ठिकाणी ‘झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा….’ असे संदेश बोर्डावर लिहिलेले असतात. मात्र, आपल्याच देशात अनेकांचे अंतिम संस्कार हे लाकडावरच होतात. त्यासाठी लाकूडे येतात कुठून? जंगलतोडीशिवाय लाकूड उपलब्धच होवू शकत नाही.

विद्युतवाहिनी असल्या तरी देखील काही कर्मठ विद्युतवाहिनी नाही, आम्ही आमच्या परंपरेनुसारच सगळ्या गोष्टी करणार म्हणतात. देशभरात विद्युतवाहिनी झाल्या पाहिजे तरच लाकूड वाचेल आणि त्यामुळे जंगलंही वाचतील, असा मुद्दा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये मांडला होता.

हेही वाचा –  नागरिकांच्या आंदोलनानंतर वाकड मधील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल, घेतला ‘हा’ निर्णय

ठाकरेंच्या याच मुद्द्याचे अभिनेते सयाजी शिंदे यांनी स्वागत केले आहे. शिंदे यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून निसर्गविषयक भरपूर काम केले आहे. ठाकरे यांना पाठिंबा देताना ते म्हणाले की, अंतिम संस्कारांच्या वेळेस लाकडांचा वापर न करता विद्युत दाहिनीचा वापर करावा, हा राज ठाकरे यांनी मांडलेला विचार महत्वाचा आहे.

हा संपुर्ण मानवजातीसाठी महत्वाचा मुद्दा आहे. परंपरेनुसर ७ मण (जवळपास ३०० किलो) लाकुड मानसाच्या अंतिम संस्करांसाठी वापरण्यात येते. एवढे लाकूड वापरले, तर जंगलं टिकणार कशी? असा सवाल देखील शिंदे यांनी उपस्थित केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button