Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“देशाच्या सुरक्षेसाठी समाजानेही सज्ज रहावे”; डॉ. मोहन भागवत

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने नागपूर येथे कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय)चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समारोप समारंभातील भाषणावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अनेक विषयांवर थेट भाष्य केले. पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशाची संरक्षण क्षमता आणि समाज एकजूट असणे किती आवश्यक आहे.

हे त्यांनी सांगताना देशाच्या सुरक्षेसाठी केवळ सैन्य आणि शासन-प्रशासन पुरेसे नाही, तर समाजानेही सज्ज असणे आवश्यक असल्याचे सांगितले. पहलगामवरील हल्ल्यानंतर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, देशात एक संतापाची लाट निर्माण झाली.

हेही वाचा –  एलन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ला भारतात हिरवा कंदील; कुठेही मिळणार फुल्ल इंटरनेट स्पीड, प्लॅन कितीचा असणार?

मोहन भागवत यांनी धर्मांतराबद्दलही भाष्य केले. मोहन भागवत म्हणाले की, स्वतःच्या इच्छेने कोणी धर्मांतर करत असेल तर कोणताही आक्षेप नसावा. मात्र, आमिष दाखवून, जबरदस्तीने किंवा फसवून धर्मांतर होऊ नये. जर जबरदस्तीने धर्मांतर झाले असेल तर ते लोक आपल्या अगोदरच्या धर्मात येत असतील तर त्यांचे स्वागतच आहे. आम्ही कोणत्याही पंथाच्या विरोधात ननसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पहलगामवर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना मोहन भागवत म्हणाले, या हल्ल्यानंतर लोकांमध्ये एक संताप बघायला मिळाला. लोकांची अपेक्षा होती की, गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी. हल्लेखोरांवर कठोर कारवाईही झाली. या दरम्यान संपूर्ण समाजात एकतेचे वातावरण दिसून आले. राजकीय मतभेद विसरून सर्वांनी सहकार्याचा हात पुढे केला. देशभक्तीच्या या वातावरणात आम्ही आपले मतभेदही मागे टाकले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button