Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

एलन मस्क यांच्या ‘स्टारलिंक’ला भारतात हिरवा कंदील; कुठेही मिळणार फुल्ल इंटरनेट स्पीड, प्लॅन कितीचा असणार?

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी दूरसंचार विभागाने (DoT) हिरवा कंदील दाखवला आहे. स्टारलिंकला ग्लोबल मोबाइल पर्सनल कम्युनिकेशन बाय सॅटेलाइट (GMPCS) परवाना मिळाला असून, यामुळे भारतात सॅटेलाइट सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मीडिया अहवालानुसार, स्टारलिंक भारतातील 90 कोटींहून अधिक वापरकर्त्यांना हायस्पीड सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून स्टारलिंक भारतात परवाना मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. 2022 मध्ये कंपनीने GMPCS परवान्यासाठी अर्ज केला होता, परंतु राष्ट्रीय सुरक्षेसह इतर काही मुद्द्यांमुळे प्रक्रियेला विलंब झाला. आता स्टारलिंकने DoT च्या सर्व नियम आणि अटी मान्य केल्या आहेत, ज्यात डेटा स्थानिकीकरण आणि सुरक्षेशी संबंधित नियमांचा समावेश आहे.

हेही वाचा – हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा उघड

वृत्तसंस्था PTI च्या सूत्रांनुसार, स्टारलिंकला पुढील 15-20 दिवसांत ट्रायल स्पेक्ट्रम मिळेल, ज्यामुळे कंपनीला सेवा चाचणी सुरू करता येईल. मात्र, स्टारलिंक आणि DoT कडून याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

भारतात सॅटेलाइट सेवा सुरू करण्याच्या शर्यतीत स्टारलिंक ही परवाना मिळवणारी तिसरी कंपनी ठरली आहे. यापूर्वी भारती समूहाची वनवेब आणि रिलायंस जियो यांना परवाने मिळाले आहेत. दुसरीकडे, अमेझॉनचा सॅटेलाइट प्रकल्प कुइपर अद्याप परवाना मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. भारताचे सॅटेलाइट ब्रॉडबँड मार्केट 2030 पर्यंत 1.9 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, आणि यात स्टारलिंकसारख्या कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. दरम्यान, स्टारलिंकच्या भारतातील मासिक रिचार्ज प्लॅनची किंमत अंदाजे ₹840 ते ₹7,000 पर्यंत असू शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button