WPL ला आजपासून सुरुवात; जाणून घ्या मोबाईलवर कुठे पाहता येतील सर्व सामने

WPL 2025 | क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. कारण WPL म्हणजेच वुमन्स प्रिमियर लीग आजपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात वडोदरातील कोटाम्बी स्टेडियम, येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात आरसीबीचे नेतृत्व स्मृती मानधना करेल, तर गुजरात जायंट्सचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाची अॅशले गार्डनरकडे आहे.
यंदाही मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, युपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स हे पाच संघ असणार आहेत. सर्व टीम प्रत्येक संघाविरूद्ध २-२ सामने खेळणार आहेत. तसेच WPL मध्ये मुंबईने एकदा आणि आरसीबीने एकदा या स्पर्धेचे जेतेपद पटकावले. तर आता तिसऱ्या सीजनचे जेतेपद कोण पटकावणार याकडे लक्ष असेल.
हेही वाचा : आशियातील सर्वात मोठ्या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा
सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कधी पाहता येणार?
चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर डब्ल्यूपीएल २०२५ च्या हंगामाच्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. याशिवाय, सामन्यांचे ऑनलाइन स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर असेल. चाहते स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर डब्ल्यूपीएल सामने देखील पाहू शकतात. यावेळी डब्ल्यूपीएल २०२५ मधील सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होतील आणि टॉस संध्याकाळी ७ वाजता होईल.
WPL च्या संघाचे कर्णधार :
- मुंबई इंडियन्स : हरमनप्रीत कौर
- दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग
- यूपी वॉरियर्स : दीप्ती शर्मा
- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : स्मृती मानधना
- गुजरात जायंट्स : अॅशले गार्डनर