Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

मनगटावरुन सुरु असलेल्या उलट-सुलट चर्चांवर अखेर सूर्यकुमार यादवने सोडलं मौन, सरळ बोलला की..

Suryakumar Yadav : इंडियन प्रीमियर लीग IPL 2026 मध्ये शेवटच्या सामन्यातही मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशाच आली. संपूर्ण सीजन फ्लॉप असलेल्या सूर्यकुमार यादवने शेवटच्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. राजस्थान रॉयल्स विरुद्ध फलंदाजी करताना त्याची बॅट चांगलीच तळपली. सूर्यकुमार यादवने 3 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 42 चेंडूत 64 धावा केल्या. पण तो मुंबई इंडियन्सला विजय मिळवून देऊ शकला नाही. मुंबई इंडियन्सचा या सामन्यात 30 धावांनी पराभव झाला. मुंबई इंडियन्सचा चालू आयपीएल सीजनमधीला हा शेवटचा सामना होता.

संपूर्ण सीजन सूर्यकुमार यादव आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसला नाही. सोशल मिडिया आणि क्रिकेट जगतात सूर्यकुमार यादवचा फिटनेस, खासकरुन मनगटाच्या दुखापतीवरुन अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. सूर्यकुमार यादवने या सर्व चर्चांवर आपलं मौन सोडलं आहे. जे लोक माझ्या मनगटाच्या दुखापतीबद्दल बोलत आहेत, कदाचित त्यांना क्रिकेटची इतकी समज नाहीय. मुंबई इंडियन्सचा हा स्टार फलंदाज बोलला की, खरच माझ्या मनगटाला दुखापत झाली असती, तर मी माझा ट्रेडमार्क फ्लिक शॉट्स कधीच खेळू शकलो नसतो.

हेही वाचा –  खजूर खाल्ल्यानंतर करताय अशी चूक, असं केल्यास आरोग्यास मिळतील तिप्पट फायदे

आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सने खूपच खराब प्रदर्शन केलं. टीम प्लेऑफमध्य स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. सूर्यकुमारला यादवला संपूर्ण सीजनमध्ये सूर सापडला नाही. या दरम्यान सोशल मिडिया आणि क्रिकेट विश्वात सूर्यकुमारचा फिटनेस खासकरुन मनगटाच्या दुखापतीबद्दल बरचं काही बोललं जातं होतं.

सूर्यकुमार यादव ब्रॉडकास्टर्सशी बोलताना म्हणाला की, “सर्वप्रथम मी मनगटाच्या दुखापतीबद्दल काही गोष्टी स्पष्ट करेन. जे कोणी असं बोलतायत एकतर ते कोणी मोठे फिजियो आहेत किंवा त्यांना क्रिकेटची समज नाही. माझ्या मनगटाला खरच दुखापत झाली असती, तर मी फ्लिक शॉट्स खेळू शकलो नसतो. माझे अनेक शॉट्स हे मनगट आणि हँड-आय कोऑर्डिनेशवर अवलंबून असतात” “मी अफवांवर जास्त लक्ष देत नाही. काही गोष्टी खेळाडूंच्या कंट्रोलमध्ये नसतात हे सुद्धा सूर्यकुमारने स्पष्ट केलं. या अशा गोष्टी आहेत, ज्या माझ्या कंट्रोलमध्ये नाहीत, त्यामुळे मी त्यावर लक्ष देत नाही” असं सूर्यकुमार यादव म्हणाला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button