संयमी शरद पवारांसोबत राहूनही शिवसेनेचे संकुचित राजकारण- आशिष शेलार
मुंबई |
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना, केलेलेल्या खळबळजनक विधानवरून अगोदरच महाराष्ट्रातील राजकारणत तापलेलं असताना व भाजपा आणि शिवसेनेत जोरदार संघर्ष काल पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांना अटक झाल्याने, रात्री उशीरापर्यंत त्यांना महाड न्यायालयाकडून जामीन मंजूर होईपर्यंत हा गोंधळ सुरू होता.
मात्र नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश नेमके कुणी दिले याची सगळीकडे चर्चा असताना, शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांची एक व्हिडिओ क्लिप माध्यमांवर व्हायरल झाली, ज्यामध्ये ते अटेकेबाबत बोलताना दिसून येत आहे. त्यामुळे आता भाजपाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत, न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान भाजपानेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेवर टीका केली आहे. “नारायण राणे यांना केलेली अटक हे बेकायदेशीर होती. अनिल परब यांनी अटकेचे आदेश दिले ते गृहमंत्री आहेत का? त्यामुळे शरद पवार यांनी देखील नाराजी व्यक्त केल्याचे आम्ही वर्तमान पत्रात वाचले आहे. गृहमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असतांना अनिल परब घूसखोरी कशी करतात, असे आशिष शेलार म्हणाले.





