ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अर्धकेंद्र योगामुळे तीन राशींचं नशिब चमकणार

22 जानेवारीपासून शनि-यम यांची अद्भूत स्थिती

महाराष्ट्र : राशीचक्रात तसं पाहिलं तर नऊ ग्रहांचं गणित मांडलं जातं. पण प्लूटो ग्रहाची स्थितीही तितकीच महत्त्वाची मानली जाते. प्लूटो ग्रहाला यम ग्रह असंही संबोधलं जातं. त्यामुळे या ग्रहाची स्थितीही राशीचक्रावर परिणाम करणारी असते. यम ग्रह एका राशीत जवळपास 17-18 वर्षे विराजमान असतात. नोव्हेंबर 2021 मध्ये प्लूटो अर्थात यम ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला होता. आता 27 मार्च 2039 पर्यंत याच राशीत राहणार आहे. दुसरीकडे, न्यायदेवता शनिदेव 30 वर्षांनंतर एका राशीत फिरून येतात. तसेच जातकाच्या कर्मानुसार फळं देतात. 22 जानेवारीला शनि आणि यम ग्रहाची एक अद्भुत स्थिती राशीचक्रावर परिणाम करणारी असणार आहे. 22 जानेवारील 2024 रोजी दोन्ही ग्रह सकाळी 9 वाजून 24 मिनिटांनी एकमेकांपासून 45 डिग्रीत असणार आहेत. यामुळे अर्धकेंद्र योग तयार होणार आहे. यामुळे काही राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात या राशींबाबत

कन्या : अर्धकेंद्र योग या राशीच्या जातकांसाठी लाभदायक ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून काम करत असलेल्या क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. कौटुंबिक पातळीवर आनंदाचं वातावरण राहील. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक फायदेशीर ठरेल.

तूळ : या राशीसाठी हा कालावधी अंत्यत चांगला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अध्यात्मिक वाटचालीला गती मिळेल. अध्यात्मिक उन्नती होईल. धार्मिक आणि तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेण्याचा योग जुळून येईल. नोकरी धंद्यात अपेक्षित यश मिळेल. आरोग्यविषयक तक्रारी दूर होतील.

मीन : या राशीला साडेसाती सुरु आहे. असं असलं तर अर्धकेंद्र योग लाभदायी ठरेल. या काळात यशाची नवी शिखरं गाठाल. आपण जसं बोलू तसं काही तरी घडताना दिसेल. कौटुंबिक पातळीवर तुमच्या शब्दाला मान असेल. तुम्ही बोलाल तसं वागण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे कामंही झटपट होतील आणि अपेक्षित यश मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button