Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उद्या शहरात पूर्वतयारी आढावा बैठक

चिंचवड पोटनिवडणूक, प्रसारमाध्यमांशी साधणार संवाद

भाजपा संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांची माहिती

पिंपरी । प्रतिनिधी
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या पिंपरी-चिंचवडमधील कोअर कमिटीची पूर्वतयारी आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती भाजपा शहर संघटक अमोल थोरात यांनी दिली.

चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दि. ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अवघ्या १५ दिवसांत अनपेक्षितपणे पोटनिवडणूक जाहीर झाली. दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान, तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उद्या, दि. २५ जानेवारी २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. त्यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, प्रदेश सरचिटणीस तथा पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत ‘कोअर कमिटी’तील पदाधिकाऱ्यांसोबत विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता हॉटेल कलासागर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहेत, असेही अमोल थोरात यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button