ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

मंगळागौरी… ही मराठी संस्कृतीची ओळख; पौर्णिमा दीपक मोढवे-पाटील

ढेपे वाडा येथे रंगला खेळ : महिलांनी लुटला महाराष्ट्रीय मेजवाणीचा आनंद

पिंपरी । प्रतिनिधी

हिंदू धर्मातील प्रथेनुसार पवित्र श्रावण महिन्यामध्ये आयेजित केली जाणारी मंगळागौर पूजा ही मराठी संस्कृतीची ओळख आहे. भगवान शंकर आणि देवी पार्वती यांची पूजा अर्चना आणि विविध पारंपरिख खेळ यामुळे आपली संस्कृती टिकून आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा दीपक मोढवे-पाटील यांचयासह महिलांनी व्यक्त केली.

श्रावण महिन्यानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा मोढवे-पाटील यांच्या पुढाकाराने ढेपे वाडा गिरीवन येथे चिंचवड-उद्योगनगर येथील क्वीन्स टाउन येथील महिलांसाठी मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शितल लढ्ढा, प्रिती ओझा, प्रिती देशमुख, , प्रियांका जाधव, राजश्री सोनवणे, पल्लवी कोतकर, वानी तेलंग, शिल्पा खाडे, अनघा काळे, बिजल शाह आदी महिला उपस्थित होत्या. मंगळागौरी कार्यक्रमानंतर महाराष्ट्रीय भोजनाचा आस्वाद महिलांनी घेतला.

हेही वाचा – धक्कादायक! वेफर्स खाल्ल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

पौर्णिमा मोढवे-पाटील म्हणाल्या की, पती-पत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिव-पार्वती या दांपत्याकडे पाहिले जाते. मंगळागौरीच्या व्रतामध्ये शिव-पार्वतीची पूजा केली जाते. मंगळागौरीचे व्रत व्यक्तिगत असले तरी पूजा मात्र सामूहिक केली जाते. पारंपरिक वेशात आम्ही ही पूजा केली. तसेच, फुगडी, झिम्मा, तळ्यात-मळ्यात, खुर्ची का मिर्ची, नाच गं घुमा, आटुंश पान, तिखट मीठ मसाला, तांदूळ सडू बाई, कीस बाई कीस.. दोडका कीस, आगोटं-पागोटं असे पारंपरिक खेळांचा आम्ही आनंद घेतला. प्रत्येक खेळाला लयबद्धता आहे व त्यासोबतची गाणी ही स्त्रीभावनांचे, तिच्या कौटुंबिक सुखदु:खांचे हे प्रतिबिंब आहे. ही संस्कृती आपण टिकवली पाहिजे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button