breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयआरोग्यताज्या घडामोडीदेश-विदेश

धक्कादायक! वेफर्स खाल्ल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

One Chip Challenge : सोशल मीडियावर रोज नवीन काही तरी पाहायला मिळत असतं. दरम्यान, सोशल मीडियावर ‘One Chip Challenge’ चांगलच चर्चेत आहे. हे चँलेज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असताना अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्समध्ये एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात ‘One Chip Challenge’ मध्ये भाग घेत असताना पीडीत तरूणाचा अपघात झाला. यामध्ये जगातील सर्वात मसालेदार चिप्स खाऊन दाखवायचे होते. आणि याच चँलेजमध्ये त्या तरूणाचा मृत्यू झाला. हॅरिस वोलोबा असे या तरूणाचं नाव आहे. त्याने चँलेंज पूर्ण केले त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा – रोहित पवार यांचा अजित पवार गटातील आमदारांना अल्टीमेटम; म्हणाले..

यापूर्वीही या चँलेंजमुळे अनेक बळी गेले आहेत. गेल्या वर्षी, कॅलिफोर्निया शाळेतील तीन हायस्कूल विद्यार्थ्यांना व्हायरल ‘One Chip Challenge’ ट्रेंडमध्ये भाग घेतल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

वन चिप चॅलेंज म्हणजे नक्की काय?

‘One Chip Challenge’ पूर्ण करण्यासाठी, गरम मिरचीपासून बनवलेल्या चिप्स खावे लागतात. आणि त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करायचा असतो. यादरम्यान #onechipchallenge हा हॅशटॅग वापरला जातो. हे चॅलेंज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे आव्हान पूर्ण करताना अनेक मुले अपघाताचे बळी ठरली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button