Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Monsoon Update : मान्सूनचे अंदाज चुकला, स्कायमेटने दिली चिंता वाढवणारी बातमी

मुंबई : राज्यात नैऋत्य मान्सूनचे रविवारी आगमन झाल्याची भारतीय हवामान विभागाने घोषणा केली. परंतु अजून पाऊस सक्रीय झालेला नाही. यासंदर्भात स्कायमेट संस्थेने वर्तवलेला अंदाज चिंता वाढवणारा आहे. ११ जून रोजी मान्सून आल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने केली होती.

देशात येत्या चार आठवड्यात तुरळक पाऊस पडणार आहे. म्हणजेच ६ जुलैपर्यंत तुरळक प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. स्कायमेटचा अंदाज खरा ठरल्यास भारताच्या मध्य आणि पश्चिम भागात दुष्काळ पडू शकतो, असा अदाज स्कायमेटने अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा – शाळेची घंटा वाजली! आजपासून राज्यातील शाळा सुरु

यंदा अल निनोचा परिणाम पावसावर असणार असल्याचा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला होता. आता अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने पहिल्यांदा केरळमध्ये पावसाचे आगमन लांबवले. त्यानंतर आता पर्जन्य प्रणालीच्या प्रगतीत अडथळा येत आहे. त्यामुळे द्वीपकल्पाच्या अंतर्गत क्षेत्रात मान्सून पोहोचण्यात अडथळे येत असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान खात्यासह खासगी हवामान संस्था व अभ्यासकांनी मान्सूनच्या आगमनाबाबत केलेले दावे चुकले. आता १८ जून ते २१ जून पर्यंत मान्सून सर्वत्र सक्रीय होईल, त्यानंतर २५ जून नंतर अनेक मान्सून तीव्र गतीने प्रवेश करेल, असा अंदाज खात्याने दिला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button