Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करावी

satara news:  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणेसाठी शासनाने सदर योजनेसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी 18 नोव्हेंबरपर्यंत करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील यांनी केले आहे.

ई-केवायसी अत्यंत सोपी असून स्वतः महिला आपल्या मोबाईलवरुन देखील करु शकते. ई-केवायसी करताना प्रथम महिला लाभार्थ्यांनी स्वतःचे आधार कार्ड प्रमाणीकरण करावे. तदनंतर पती, वडील यांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करुन घेण्यात यावे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व महिला लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ज्या महिलांनी या कालावधीत ई-केवायसी केली नाही तर ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील, याची नोंद घ्यावी.

हेही वाचा –  ‘माधव अगस्ती यांची वेशभूषा क्षेत्रातील कारकीर्द प्रेरणादायी’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

योजनेच्या ज्या महिला लाभार्थ्यांची पती, वडील दोन्हीही मयत आहेत, किंवा ज्या अविवाहित महिलांचे वडील मयत आहेत, तसेच विधवा, घटस्फोटीत, परितक्त्या महिला यांचे ई-केवायसीबाबत शासनस्तरावरुन निर्णय घेण्याबाबत विचार विनिमय सुरु आहे. परंतु तत्पूर्वी अशा महिलांनी फक्त त्यांचेच आधार कार्ड प्रमाणीत करुन अपूर्ण ई-केवायसी 18 नोव्हेंबर पर्यंत करुन घेणे आवश्यक आहे. अपूर्ण ई-केवायसी पूर्ण करुन घेण्याबाबत शासनामार्फत स्वतंत्र सूचना निर्गमित करण्यात येणार आहेत. तसेच अशा महिलांनी परस्पर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करु नये, असेही आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती पाटील यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button