Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

गणेशोत्सवसंदर्भात महत्त्वाची बातमी; सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गणेशोत्सव हा राज्याचा उत्सव म्हणून साजरा करणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी अधिवेशनात केली आहे.

भाजप आमदार हेमंत रासणे यांनी यासंदर्भातील प्रस्ताव विधिमंडळाच्या पावसाठी अधिवेशनात मांडला होता. त्यावर बोलताना शेलार यांनी गणेशभक्तांना मोठा दिलासा दिला आहे. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. २७ ऑगस्ट रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. गणेशोस्तवाला काही दिवस उरसे असतानाच राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

गणेशोत्सवात नियमांची आडकाठी येऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करतंय. गणेशोत्सव हा राज्याचा स्वाभिमान आहे असंही शेलार यावेळी म्हणाले. महाराष्ट्राचा गणेशोत्सव १८९३ ला लोकमान्य टिळकांनी सुरू केला. गणेशोत्सवाला सामाजिक, राष्ट्रीय आणि स्वतंत्रता, स्वाभिमान, स्वभाषा याच्याशी संबंधित अशी पार्श्वभूमी आहे. गौरव आणि अभिमान असलेला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा महोत्सव म्हणून राज्य सरकार घोषित करेल असं राज्याच्या पावसाळी अधिवेशनात राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं.

हेही वाचा –  ‘मोदी ७५ वर्षांचे होतायंत म्हणून निवृत्तीचे संकेत’; संजय राऊतांचं विधान

तसेच, देशात नव्हे तर जगात या गणेशोत्सवाची व्याप्ती, संस्कृती, प्रवृत्ती आणि प्रचार यासाठी सरकार कटिबद्ध राहील.  काही लोकांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिक परंपरेला कुठे ना कुठे परंपरागत गणेशोत्सवाला बाधा निर्माण होईल असा प्रयत्न केला. पण महायुतीचं सरकार सगळ्या निर्बंधांना ,स्पीड ब्रेकरना बाजूला करण्यासाठी शिघ्रतेनं काम केलं. पीओपीच्या बाबतीतही पर्यावरणपूरक गणपती असायला हवा. पीओपी घातक आहे की नाही यासाठी अहवाल दिला आणि निर्बंध हटवले. पीओपी मुर्त्यांना परवानगी मिळाली. विसर्जनाचा मुद्दा आहे त्याबाबतही बैठक घेतली. जलस्रोत प्रदुषित होऊ नयेत पण परंपरागत समुद्रात होणारं विसर्जन यासंदर्भात धोरण न्यायालयासमोर मांडत आहोत असं आशिष शेलार यांनी सांगितले.

पोलीस विभाग असेल, आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च, पुणे-मुंबईतला महोत्सव यासाठी लागेल तेवढा निधी या व्यवस्थेकरता खर्च सरकार करेल. सर्व गणेशोत्सव मंडळांना विनंती आहे की, सामाजिक उपक्रम, देशानं जे कमावलंय, महापुरुष यांच्या देखाव्यांचा विचार करावा. पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव म्हणून राज्याचा उत्सव घोषित करण्यास आनंद होतोय अशी भावनादेखील शेलार यांनी यावेळी व्यक्त केली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button