Weather Update : यंदा उन्हाळा कसा असणार? हवामान विभागाने जारी केला अंदाज
![How will summer be this year? Forecast issued by Meteorological Department](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Weather-Update-780x470.jpg)
Weather Update : यंदा पावसाळा समाधानकारक झाला नाही. देशातील अनेक भागांत सरासरी इतका पाऊस झाला नाही. त्यानंतर आता राज्यात ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. यामुळे यंदा उन्हाळा कसा असणार आहे. याचा अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे.
राज्यात ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. मात्र, पुढील दोन, तीन दिवस राज्यातील अनेक शहरांत ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे वाढत्या तापमानातून दिलासा मिळणार आहे. पुणे शहराचे कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. मुंबईत तापमानाचा पारा ३४ अंशावर होते. विदर्भात अधिक तापमान होते. सध्या १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील वातावरण ढगाळ राहणार आहे.
हेही वाचा – चांद्रयान-3 च्या विक्रम लॅण्डरविषयी इस्त्रो प्रमुखांनी दिली मोठी अपडेट; म्हणाले..
15 𝙾𝚌𝚝𝚘𝚋𝚎𝚛, 𝚕𝚊𝚝𝚎𝚜𝚝 𝚜𝚊𝚝𝚎𝚕𝚕𝚒𝚝𝚎 𝚘𝚋𝚜 𝚊𝚝 8.30 𝚙𝚖
𝙺𝚘𝚕𝚑𝚊𝚙𝚞𝚛, 𝚙𝚊𝚛𝚝𝚜 𝚘𝚏 𝚂𝚘𝚞𝚝𝚑 𝚔𝚘𝚗𝚔𝚊𝚗, 𝚐𝚑𝚊𝚝 𝚊𝚛𝚎𝚊𝚜 𝚌𝚕𝚘𝚞𝚍𝚢.
𝚃𝚑𝚞𝚗𝚍𝚎𝚛 𝚊𝚝 𝚒𝚜𝚘𝚕𝚊𝚝𝚎𝚍 𝚙𝚕𝚊𝚌𝚎𝚜 𝚒𝚗 𝚔𝚘𝚗𝚔𝚊𝚗 𝚛𝚎𝚙𝚘𝚛𝚝𝚎𝚍 𝚒𝚗 𝚕𝚊𝚜𝚝 2,3 𝚑𝚛𝚜. pic.twitter.com/Gk8YEYcar0— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 15, 2023
पुणे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, यंदाचा उन्हाळा हा अधिक दाहक असण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात पहाटेचे किमान तापमान ३ ते ४ डिग्रीने अधिक असण्याची शक्यता आहे. दुपारच्या तापमानातही २ डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या तामिळनाडूमध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. यामुळे येते ३ दिवस मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.