मंत्री उदय सामंत यांची जेएनयू मधील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राला भेट!
सामंत हे जेएनयू विद्यापीठाला भेट देणारे पहिले मंत्री

दिल्ली | महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. उदय सामंत यांनी आज दिल्ली येथील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) ला भेट दिली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राला भेट देऊन माहिती घेतली.
यावेळी मंत्री उदय सामंत हे महाराष्ट्रातून JNU विद्यापीठाला भेट देणारे ते पहिले मंत्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यादरम्यान, कुलगुरू प्रा. संतश्री पंडित यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. भविष्यात होणाऱ्या शैक्षणिक बदलांसंदर्भात सखोल संवाद साधण्यात आला. उच्च शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासंदर्भात सकारात्मक चर्चा घडून आली.
हेही वाचा : सभागृहाच्या कामकाजात सातत्याने उपस्थित असाल तेव्हाच संसदीय आयुधांचा योग्य वापर शिकता येईल
या विशेष प्रसंगी डीन अभिताभ मुत्तू, संजय नाहर, डॉ. राजेश खरात यांसह JNU विद्यापीठातील अनेक प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली आणि शैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र व JNU यांच्यात अधिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा केली.