breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदेश-विदेश

चांद्रयान-3 च्या विक्रम लॅण्डरविषयी इस्त्रो प्रमुखांनी दिली मोठी अपडेट; म्हणाले..

Chandrayaan-3 Vikram Lander : २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या चांद्रयान-3 या अंतराळयानाच्या विक्रम लँडरविषयी एस. सोमनाथ यांनी अपडेट दिला आहे. सोमनाथ यांच्या माहितीनुसार विक्रम सध्या काय करतो याविषयी जाणून घेऊया..

एस. सोमनाथ म्हणाले, चंद्रावरील दिवसाच्या कालावधी दरम्यान (पृथ्वीवर १४ दिवसांचा कालावधी) विक्रमने आपले काम चांगले केले आहे. आणि आता तो चंद्रावर आनंदाने झोपी गेला आहे. भविष्यात जर चंद्रावर झोपी गेलेल्या विक्रमला जागे व्हावे असे वाटत असेल तर तो तेव्हा जागा होईलच, तोपर्यंत आम्ही वाट पाहू.

हेही वाचा – ‘..पण गिरीश महाजनांना नोहमी मोठी खाती मिळतात’; शिंदे गटातील नेत्याचं विधान 

२३ ऑगस्ट रोजी ऐतिहासिक लँडिंग केल्यानंतर, लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सल्फरची उपस्थिती शोधणे आणि तापमान रेकॉर्ड करणे अशी महत्त्वपूर्ण कामे विक्रमने केली होती. चंद्रावर रात्र सुरू झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये स्लीप मोडमध्ये आणल्यानंतर रोव्हर प्रज्ञान आणि लँडर विक्रम यांच्याशी संवाद पुन्हा स्थापित करण्यासाठी इस्रोने प्रयत्न केले होते मात्र त्यांच्याकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरूच राहतील, असं एस. सोमनाथ म्हणाले.

इस्रोच्या अंतराळ संशोधनच्या संबंधित आगामी मोहिमांविषयी माहिती देताना सोमनाथ म्हणाले, अनेक शोध मोहिमा राबवण्याचा आमचा विचार व प्रयत्न आहे. मंगळ, शुक्र आणि पुन्हा कधीतरी चंद्रावर जाण्याची आमची योजना आहे. पृथ्वीच्या हवामानाच्या पट्ट्याजवळील तापमान आणि हवामान यांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा नियोजन सुरु आहे. याशिवाय सॅटेलाईट संपर्काच्या संबंधित नियमित कामे सुरूच आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button