मातृपितृ पूजन करून विद्यार्थ्यांसमोर ठेवला भारतीय संस्कृतीचा आदर्श!
शिक्षण विश्व: एस.पी.जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये मातृपितृ पूजन दिवस उत्साहात साजरा

पिंपरी- चिंचवड | “मातृ देवो भवः… पितृ देवो भवः” असा महान संदेश देणारी आपली भारतीय संस्कृती आहे. शाळेमध्ये मातृपितृ पूजन दिवस साजरा करून विद्यार्थ्यांना माता-पितांना सन्मान, प्रेम आणि काळजी घेण्यासाठी संदेश दिला जातो. असे एस.पी.जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे अध्यक्ष पांडुरंग गवळी म्हणाले.
एस.पी.जी. इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये मातृपितृ पूजन दिवस उत्साह आणि आनंदाने साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकवर्गाने आणि पालकांनी एकत्र येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या.
हेही वाचा : EVM बद्दल सुप्रीम कोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस, दिले ‘हे’ नवे निर्देश
शाळेचे अध्यक्ष पांडुरंग नाना गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेचे संचालक नितीन लोणारी , मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड यांनी कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजनाने केली. श्री योग वेदांत सेवा समिती या संस्थे द्वारा कार्यकामाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या संचालिका कीर्ती टिकाम यांनी भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचे संरक्षण – संवर्धन करण्याच्या दृष्टीने मुलांच्या समोर आई वडिलांना बसविण्यात आले. मुलांनाकडून आई वडिलांचे पूजन करण्यात आले. प्रदक्षिणा घालून नमन केले. यावेळी मुलांनी आई वडिलांना मिठी मारली आणि आई वडिलांनी मुलांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला.