Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमराठवाडा

भाजपा नेत्या पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका, म्हणाल्या…

बीड । प्रतिनिधी

भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा वाकयुद्ध रंगले आहे. पंकजा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्राद्वारे काही मागण्या केल्या आहेत. यावर टीका करताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना फटकारले आहे.

परळी वैजनाथ तालुक्यातील  मौजे पोहनेर येथे गोदावरी गंगा पात्रातील वाळू उपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पंकजा मुंडे यांनी केली होती. तसेच,  बीड जिल्ह्यात करोना रुग्णांना लागणारे रेमडेसीवीर इंजेक्शन आणि वॅक्सीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्याबाबत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे.

यावर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना डिवचले आहे. धनंजय यांनी म्हटले आहे की, ताईसाहेब, मा. मुख्यमंत्र्यांना व मा. आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेवून एखादे पत्र मा. पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा. जेणेकरुन करोनाविद्धच्या लढाईत खरोखरच आपली मदत होईल.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनीही धनंजय यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. पंकजा यांनी म्हटले आहे की, राज्याच्या भल्यासाठीPM,जिल्ह्याच्याCM आणि पवार साहेबांना ही पत्र लिहीन दखल ही घेतली जाईल!तुम्ही त्यांनी दिलेल्या संधीचा तरी सन्मान करा.तुम्ही बीडमध्ये दमडीही आणली नाही.विमा,विकास निधी,अनुदान काही नाही,माफिया मात्र आणले.जुन्या निधीचे काम तरी करा,उद्घाटन करा हक्क तुम्हाला आहेच भाऊ!

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button