मीरा बोरवणकरांचा बोलवता धनी कोण? अजित पवार गटाचा सवाल

पुणे : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकारतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आप्रत्यक्षपणे गंभीर आरोप केला आहे. दादांनी येवरड्यातील पोलीस खात्याच्या जमिनीचा लिलाव करण्यास सांगितलं असल्याचं मीरा बोरवणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावरून अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
मिरा बोरवणकरांना अचानक आत्मचरित्र लिहावं असा साक्षात्कार होणे, आपलं नावंही कुणाला माहिती नाहीं व पुस्तकही कुणी वाचायला घेणार नाहीं म्हणुन केवळ प्रसिद्धसाठी सोयीच बिनबुडाचे आरोप करत अजितदादांवर टिका करून पुस्तकाचा खप वाढवणे, मिराबाई तुमचा बोलविता धनी कोण? तो शोधावाच लागेल, असं अजित पवार गटातील नेते अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – Weather Update : यंदा उन्हाळा कसा असणार? हवामान विभागाने जारी केला अंदाज
मिरा बोरवणकरांना अचानक आत्मचरित्र लिहावं असा साक्षात्कार होणे, आपलं नावंही कुणाला माहिती नाहीं व पुस्तकही कुणी वाचायला घेणार नाहीं म्हणुन केवळ प्रसिद्धसाठी सोयीच बिनबुडाचे आरोप करत अजितदादांवर टिका करून पुस्तकाचा खप वाढवणे, मिराबाई तुमचा बोलविता धनी कोण? तो शोधावाच लागेल.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) October 15, 2023
दरम्यान, यावरून अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनीही भाष्य केलं आहे. पुस्तक प्रकाशन करताना त्याची चर्चा व्हावी, आपण प्रसिद्धी झोतात यावं यासाठी मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर खोटे आरोप केलेले आहेत. मीरा बोरवणकर यांनी यासंदर्भात पुरावे द्यावे, अन्यथा त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.





