समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार पेटल्याने पाच जणांचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. वर्ध्यातील विरुळ गावाजवळ रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मालवाहू वाहनाची कारला मागून जोरदार धडक बसली, आणि त्यामुळे त्या कारने तत्काळ पेट घेतला. आगीच्या ज्वाळा उसळल्या. कारने अचानक पेट घेतल्याने गदारोळ झाला, मात्र दुर्दैवाने कारमधील चाह जणांचा मृत्यू झाला. तसेच ज्या मालवाहू वाहनाची कारला धडक बसली त्यातीलही एका व्यक्ती मृत झाली. तर अन्य एक गंभीर जखमी असून त्याच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गवर इथेनॉल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला होता. त्यामुळे दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू होती. विरूळ गावाजवळ मालवाहू वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो डायरेक्ट समोरच्या कारला जाऊन धडकला. ही टक्कर एवढी भीषण होती की कारने तत्काळ पेट घेतला. त्यातील प्रवाशांना खाली उतरण्याची , जीव वाचवण्याचीही संधी मिळाली नाही. आणि दुर्दैवाने होरपळून चौघांचाही मृत्यू झाला. तर मालवाहू वाहनामधील एकानेही या अपघातात जीव गमावला.
हेही वाचा
CJP च्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज; मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम
या अपघातानंतर समृद्धी महामार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. तर एका बाजूची वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू होती. अपघाताचे वृत्त समजताच महामार्ग पोलीस, पुलगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. जखमीला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.





