Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

CJP च्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज; मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम

नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत मोठे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) कडून आयोजित करण्यात आलेला ‘संसद मोर्चा’ जंतरमंतरवरच अडवण्यात आल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना संसदेच्या दिशेने जाण्यापासून रोखताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिल्ली पोलिसांनी मोर्चावर लाठीमार केला.

मिळालेल्या माहितीनुसार, कॉकरोच जनता पार्टीचे हजारो कार्यकर्ते आणि विद्यार्थी जंतरमंतर येथे जमा झाले होते. तेथून संसदेवर धडक मारण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत आंदोलकांना जंतरमंतर परिसरातच रोखले. मात्र, पोलीस बंदोबस्त भेदून पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे जंतरमंतर परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

हेही वाचा

मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र हाऊसफुल्ल; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून पाहणी

कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चामध्ये विरोधी पक्षाचे अनेक नेतेही सहभागी झाले आहेत. आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, संजय सिंह, आझाद समाज पार्टीचे प्रमुख, खासदार चंद्रशेखर देखील सहभागी झाले आहेत. या व्यक्तीरिक्त अभिनेते प्रकाश राज, सोन वांगचुकी यांची पत्नीही सामील झाली आहे.

मेट्रो स्टेशन बंद, इंटरनेट जॅम

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशनवर गर्दी झाल्यास मेट्रो स्टेशनची एन्ट्री आणि एग्झिट एन्ट्री बंद करण्याचं योजना आखली आहे. विविध मेट्रो स्टेशनवर पोलिसांची नजर असणार आहे. पोलिसांकडून परिस्थितीनुसार अत्यावश्यक पावले उचलली जाणार आहेत. तर प्रशासनाकडून इंटरनेट जॅम देखील करण्यात आलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button