Breaking-newsआंतरराष्ट्रीय

अमेरिका रशियावर किंवा पुतीन यांच्यावर विश्‍वास ठेवत नाही – निकी हॅले

वॉशिंग्टन – अमेरिका रशियावर किंवा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर कधिच विश्‍वास ठेवणार नाही, तसेच रशिया हा कधिच आमचा मित्र होणार नसल्याचे विधान करत अमेरीकेच्या संयुक्त राष्ट्रातील प्रतिनीधी निकी हॅले यांनी आपल्या विधानाने एकच खळबळ उडवून दिली आहे. दोन्ही देश एकत्र आल्यास अनेक संधी निर्माण होतील. गेल्या काही वर्षात दोन्ही देशांदरम्यान संबंध चांगले नाहीत. आता हे थांबविले जाईल, असे ट्रम्प यांनी पुतीन यांच्या भेटीनंतर केलेल्या विधानानंतर हे विधान आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गेल्याच अठवड्यात ट्रंप पुतीन यांना हेलसिंकी येथे भेटले होते, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ट्रंप यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रशियाच्या हस्तक्षेपाची शक्‍यता फेटाळून, अमेरिकेच्याच गुप्तचर यंत्रणांच्या निष्कर्षावर अविश्वास दाखविला होता.त्यावरुन त्यांच्यावर स्थानिक माध्यमांतून बरीच टिका करण्यात आली होती. त्या पार्श्‍वभुमीवर हे विधान केल्याचे बोलले जात आहे.

हॅले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगीतले की, आम्ही कधीच रशियावर किंव त्यांच्या अध्यक्षांवर विश्‍वास ठेवणार नाही. आम्ही कधीही त्यांचे मित्र होणार नाही. मात्र यावेळी त्यांनी रशिया सोबत होणाऱ्या चर्चेची पाठराखण देखिल केली.

माझ्या मते अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांनी किम जोंग उन किंवा पुतिन यांच्या सोबत चर्चा करणे महत्वाचे आहे, ही गोष्ट घडायलाच हवी. नाहीतर त्यामुळे दोन्ही देशांमधिल तणाव कसा कमी होणार असेही त्यांनी यावेळी सांगीतले.
ट्रंप यांची संवाद साधण्याची शैली वेगळी आहे त्यांच्या मते समोरा समोर बोलल्याने कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर मिळते, याच रणनितीचा अवलंब करुन त्यांनी (ट्रंप) चीनचे राष्ट्रध्यक्ष शि जिनपींग आणि कोरियाचे अध्यक्ष किम यांच्या सोबत संवाद साधला होता. असे हॅले यांनी सांगितले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button