Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या स्पेनवर पैशांचा पाऊस; विजेत्या रकमेने रचला नवा इतिहास!

FIFA World Cup 2026 Prize Money | फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेन संघाने गतविजेत्या अर्जेंटिना संघाचा १-० असा पराभव करत तब्बल १६ वर्षांनंतर दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या सामन्यात स्पेनच्या फेरान टोरेसने अतिरिक्त वेळेत (१०६ व्या मिनिटाला) केलेला गोल निर्णायक ठरला. या पराभवासह अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सी आणि त्याच्या संघाचे सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

अंतिम सामन्यात निर्धारित ९० मिनिटांपर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नव्हता. अतिरिक्त वेळेच्या दुसऱ्या सत्रात (१०६ व्या मिनिटाला) निको विल्यम्सच्या पासवर राखीव खेळाडू फेरान टोरेसने शानदार गोल करत स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अखेरच्या मिनिटांत अर्जेंटिनाचा खेळाडू एन्झो फर्नांडेझ याला रेड कार्ड मिळाल्याने अर्जेंटिनाला १० खेळाडूंसह खेळावे लागले.

हेही वाचा

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कार पेटल्याने पाच जणांचा मृत्यू

विक्रमी बक्षीस रक्कमेची खैरात

फिफा परिषदेने (FIFA Council) २०२६ च्या विश्वचषकासाठी एकूण $७२७ दशलक्ष (सुमारे ₹६,२१६ कोटी) चा निधी मंजूर केला होता, ज्यातील $६५५ दशलक्ष (सुमारे ₹५,६०० कोटी) रक्कम ४८ सहभागी संघांमध्ये बक्षीस म्हणून वाटप करण्यात आली. २०२२ च्या तुलनेत यंदाच्या बक्षीस रक्कमेत ५०% वाढ करण्यात आली आहे.

FIFA WC 2026 बक्षिसाच्या रकमेचं वितरण पुढीलप्रमाणे

  • विजेता – स्पेन – ५० दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे ४२८ कोटी)
  • उपविजेता – अर्जेंटिना – ३३ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे २८२ कोटी)
  • तिसरे स्थान – इंग्लंड – २९ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे २४८ कोटी)
  • चौथे स्थान – फ्रान्स – २७ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे २३१ कोटी)

इतर संघांसाठी बक्षिसाची रक्कम

  • ५वे ते ८वे स्थान – १९ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे १६२ कोटी)
  • ९वे ते १६वे स्थान – १५ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे १२८ कोटी)
  • १७वे ते ३२वे स्थान – ११ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे ९४ कोटी)
  • ३३वे ते ४८वे स्थान – ९ दशलक्ष अमेरिकी डॉलर (सुमारे ७७ कोटी)

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button