युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर उद्योगनगरीत हायअलर्ट
महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ; वरिष्ठ पोलीस अधिकार्यासंह कर्मचार्यांच्या रजा रद्द

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’चा तडाखा दिल्यानंतर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर पिंपरी – चिंचवड पोलीसांनीही शहरात हायअलर्ट जारी केला आहे. महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकार्यासंह कर्मचार्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा भाग लष्करी दृष्टिकोनातून विशेष महत्त्वाचा भाग मानला जातो. दापोडी येथे लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (सीएमई) परिसर आहे. दिघी येथे संशोधन व विकास संस्था (आर अॅण्ड डीई) आहे. देहुरोड येथे अॅम्युनिशन डेपो आहे. तर, तळेगाव दाभाडे येथे एनडीआरएफचे कार्यालय आहे. त्यामुळे हा परिसर लष्करासाठी अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील आहे. सध्या देशभरात युद्धजन्य वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड पोलीसांनी पोलिसांनी खबरदारी घेण्याच्या
सूचना जारी केल्या आहेत. महत्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
हेही वाचा – “पाकिस्तानने औकातीत राहून भारताशी पंगा घ्यावा, अन्यथा नामोनिशाण”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले
‘व्हिजीबल पोलीसिंग’वर भर
शहरात शांतता अबाधित राखण्यासाठी व कायदा – सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता व्हिजीबल पोलीसिंग राबवले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी भेटी देवून सुचना दिल्या जात आहेत. नागरिकांशी संवाद साधला जात आहे. पोलीस आयुक्तालयातील जास्तीत जास्त वरिष्ठ पोलीस अधिकारी व अमंलदार हे सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीची ठिकाणे असणारे मॉल, व्यापारी संकुल, बाजार पेठ, उद्याने, पर्यटन स्थळे, रेल्वे बस स्थानक या सारख्या महत्वाच्या ठिकाणी भेटी देवून सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी योग्य पद्धतीने करण्याबाबत सुचना दिल्या जात आहेत. पोलिसांची विविध पथके तयार करुन त्याद्वारे गोपनीय माहिती संकलीत केली जात आहे. चुकीच्या अथवा सोशल मिडीयावर अफवा पसरविणार्या संदेशांवर पोलीस बारकाईने नजर ठेवून आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
”पोलीस आयुक्तालय हद्दीतील महत्वाची ठिकाणे तसेच, संवेदनशील आस्थापना या
ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. व्हिजीबल पोलीसिंग राबवले जात
आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.”
– संदीप डोईफोडे (पोलीस उपायुक्त)