इलेक्ट्रिक कार आता पेट्रोलच्या बरोबरीने: सहा महिन्यांत किंमती समान; नितीन गडकरींचा मोठा दावा!

नवी दिल्ली : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती वेगाने वाढत आहे. या अगोदर इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती कमी प्रमाणात होत होती. आता वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होत आहे. अशा परिस्थितीत पुढील सहा महिन्यात देशात इलेक्ट्रिक कारचे आणि पेट्रोल कारचे दर समान होतील, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
नवी दिल्लीत 32 व्या कनवर्जन्स इंडिया एक्सपो, स्मार्ट मोबईलीटी इंडिया एक्सपो आणि 10व्या स्मार्ट सिटी इंडिया कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.
सध्या इलेक्ट्रिक कारच्या किमती पेट्रोल कारपेक्षा जास्त आहेत. या कमी व्हाव्यात यासाठी केंद्र सरकार प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या अनुदान देत आहे. आता अनुदान देण्याचे प्रमाणही कमी होत असून लवकरच या कंपन्या अनुदानाशिवाय उत्पादन करतील असे या कंपन्यांनी सांगितले आहे. देशातील इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांनी व या कंपन्यांना सुटे भाग पुरविणार्या कंपन्यांनी महाग आयातीऐवजी देशातच सुटे भाग कमी किमतीत तयार करावे अशी सरकारची इच्छा आहे. यासाठी संशोधन आणि विकासाला सरकार चालना देत आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होण्याबरोबरच उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल.
हेही वाचा – HSRP नंबर प्लेटसाठी तिसरी मुदतवाढ: 30 जूनपर्यंत संधी, 18 लाख वाहनांचे अपग्रेड पूर्ण!
रस्ते जागतिक दर्जाचे झाल्यानंतर त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होऊन अर्थव्यवस्थेला आणि नागरिकांना मदत होते. जर भारताला विकसित व्हॉयचे असेल तर भारतातील रस्त्याचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून सरकारचे प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर हरित ऊर्जा जास्तीत जास्त निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
रित ऊर्जा निर्मितीचा वाटा 42 %
देशात सध्या एकंदर वीजनिर्मितीच्या क्षेत्रात हरित ऊर्जा निर्मितीचा वाटा 42 टक्के इतका आहे. केंद्र सरकार पर्यायी इंधन आणि आणि जैव इंधन निर्मितीला प्रोत्साहन देत आहे. भविष्यात देशातील काही शहरांमधील प्रवासाचा वेळ अगदी कमी करण्याच्या दृष्टीने अनेक नवीन रस्ते प्रकल्प सुरू होत असून, त्याद्वारे दिल्ली – डेहराडून , दिल्ली – जयपूर तसच चेन्नई – बंगरुळू या शहरांमधील अंतर केवळ 2 तासात पार करता येईल. दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा प्रवास केवळ 12 तासात करता येईल, असंही गडकरी यांनी यावेळी सांगितले.