मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला १ कोटींची खंडणी घेताना अटक

सातारा | राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांचा मागणी केली होती. यामध्ये १ कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
सातारा स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत मंत्री गोरेंवर आरोप करणाऱ्या माहिलेला अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या महिलेने मंत्री गोरेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर सभागृहात मंत्री गोरेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. मात्र आता याच महिलेने प्रकरण मिटवण्यासाठी ३ कोटी रुपयांची मागणी केली होती आणि त्यापैकी १ कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने महिलेला रंगेहात पकडलं आहे. माहितीनुसार सध्या महिला सातारा पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांकडून महिलेची कसून चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा : देशात सर्वाधिक घटस्फोट महाराष्ट्रात, अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर
दरम्यान, यावरून आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ३ कोटी हा आकडा खूप मोठा आहे. १ कोटी रुपये दिलं कशाला? त्या महिलेकडे असं काय होते की, त्यासाठी तुम्हाला पैसा द्यावा लागला. तेसुद्धा १ कोटी रुपये आले कुठून? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
नेमकं प्रकरण काय?
जयकुमार गोरे यांनी २०१७ मध्ये मानसिक त्रास देण्यासाठी स्वतःचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले असा आरोप या महिलेने केला होता. या प्रकरणात गोरे यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्याता आला होता. मात्र २०१९ मध्ये या प्रकरणात न्यायालयाने निकाल देत गोरे यांना निर्दोष मुक्त करत जप्त केलेला मुद्देमाल आणि मोबाईल नष्ट करण्याचे आदेश गोरे यांना न्यायालयाने दिले होते.