Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

HSRP नंबर प्लेटसाठी तिसरी मुदतवाढ: 30 जूनपर्यंत संधी, 18 लाख वाहनांचे अपग्रेड पूर्ण!

मुंबई :  राज्यातील वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर झाली आहे. आता 30 जून 2025 पर्यंत वाहनचालकांना ही नंबर प्लेट बसवता येणार आहे. आतापर्यंत फक्त 18 लाख वाहनांनाच HSRP बसवण्यात आल्याने परिवहन आयुक्तांनी ही तिसरी मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 30 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत मुदत होती, पण कमी प्रतिसादामुळे हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या योजनेवरून वादही निर्माण झाले असून, सरकारवर जादा शुल्क आकारणीचा आरोप होत आहे.

राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व जुन्या वाहनांसाठी HSRP सक्तीचे आहे. आतापर्यंत अंदाजे 18 लाख वाहनांनी ही नंबर प्लेट बसवली आहे. या प्रक्रियेसाठी राज्य सरकारने तीन खासगी एजन्सींची नियुक्ती केली असून, नागरिकांना ऑनलाइन नोंदणी आणि अधिकृत केंद्रांद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

हेही वाचा –  प्रत्येक UPI व्यवहारावर 0.15 टक्के प्रोत्साहन मिळणार; छोट्या व्यापाऱ्यांना फायदा

HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी कशी कराल?

1 एप्रिल 2025 नंतर राज्यातील सर्व वाहनांसाठी HSRP बंधनकारक असेल. नोंदणी प्रक्रिया सोपी आहे. सर्वप्रथम, गुगलवर “HSRP Number Plate” सर्च करा. त्यानंतर महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट transport.maharashtra.gov.in उघडा. होम पेजवर “Apply High Security Registration Plate Online” पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर कार्यालय निवडण्याचा पर्याय येईल. येथे “APPLY HSRP” वर क्लिक करा. पुढे “Order HSRP” निवडा. आता तुम्हाला वाहनाचा नोंदणी क्रमांक, चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक, इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल. यानंतर पेमेंट पेज उघडेल, जिथे तुम्ही शुल्क भरू शकता.

नोंदणीसाठी किती खर्च येणार?

दुचाकी आणि ट्रॅक्टर: 450 रुपये

तीनचाकी: 500 रुपये

चारचाकी आणि इतर वाहने: 745 रुपये

या निर्णयामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला असला तरी, सरकारच्या शुल्क आकारणीवर टीका कायम आहे. आता 30 जूनपर्यंत सर्व वाहनांना HSRP बसवण्याचे आव्हान परिवहन विभागासमोर आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button