भूत मानगुटीवर, आदित्य लटकणार?
दिशा सालियनचे वडील सतीश 'ॲक्शन मोड' मध्ये : घेतली कोर्टात धाव

पुणे : प्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची सहकारी म्हणजे व्यवस्थापिका दिशा सालियन हिच्या खूनप्रकरणी तिचे वडील पाच वर्षानंतर ‘ॲक्शन मोड’ मध्ये आल्यामुळे आणि त्यांनी तपासासाठी कोर्टात धाव घेतल्यामुळे राजकीय वातावरण अतिशय चिघळले आहे. या मुद्द्यावर विधान परिषदेत हमरी तुमरी झाली.
सामूहिक बलात्कार शब्द गाळला !
दिशा सालियन हत्येप्रकरणी नेमण्यात आलेल्या ‘एसआरटी’ चा अहवाल प्रसिद्ध करा, या मागणीवरून मुद्दा तापला. तिच्या मूळ पोस्टमार्टम मध्ये असलेला सामूहिक बलात्काराचा मुद्दा वगळण्यात आल्याचा आरोपही झाला. उंच इमारतीवरून पडून दिशाचा मृत्यू झाला, असे नमूद करण्यात आले असले तरी ती ज्या ठिकाणी पडली होती, तेथे रक्ताचा टिपूसही दिसला नाही. शिवाय, त्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला गेल्याचेही सांगण्यात आले. या वास्तवावर वार-पलटवार झाले.
खून प्रकरणाला वेगळे वळण
दिशा सालियन खूनप्रकरणाला नवीन वळण मिळण्याची दाट शक्यता आहे. दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. मुंबईत २०२० मध्ये दिशाचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला होता. पण, हे प्रकरण घडल्यानंतर पाच वर्षांनी, सामूहिक बलात्कार करुन दिशाची हत्या केल्याचा गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आदित्य ठाकरे यांचे थेट नाव..
याप्रकरणी, आमदार आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे, हे प्रकरण त्यामुळे आदित्य यांच्या अंगलट येऊ शकते.
हेही वाचा – श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील तुकोबारायांचे पहिले मंदिर पूर्णत्वाच्या मार्गावर
दिशा खूनप्रकरण नेमकं काय?
सुशांतसिंह राजपूतच्या व्यवस्थापिका असलेल्या दिशा सालियनचा मृत्यू सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच झाला होता. दिशाचा मृत्यू दि. ८ आणि ९ जून २०२० च्या रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून झाला. त्यानंतर, फक्त पाच दिवसांनी म्हणजे दि. १४ जून २०२० रोजी सुशांतसिंह राजपूत आपल्या घरात मृतावस्थेत आढळला होता.
पाच दिवसाच्या अंतराने मृत्यू
दोघांच्या मृत्यूच्या या घटनांना अत्यंत गांभीर्यपूर्वक अनेकांनी एकत्र जोडले. दोन मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींचा मृत्यू एकाच काळात घडणे, एक मोठा योगायोग होता. दिशाच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी तिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम झाले आणि अहवाल आला. मात्र, तिच्या पोस्टमॉर्टमसाठी जाणूनबुजून वेळ लावण्यात आला का? असा सवालही त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय ?
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये, डोक्यावरील आणि शरीरावरील अनेक जखमांमुळे दिशाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पण, रिपोर्टमध्ये दिशावर अत्याचार झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले की नाही ? यावरुन सुद्धा वेगवेगळे दावे करण्यात आले होते. दिशाच्या गुप्तांगावर कोणत्याही जखमा नसल्याचे सुद्धा पोस्टमॉर्टममध्ये सिद्ध झाले. मृत्यूपूर्वी तिच्यावर छळ झाल्याचा दावा तपास यंत्रणांनी फेटाळून लावल्याचेही सांगण्यात आले.
आदित्य ठाकरेंचं कनेक्शन?
दिशा सालियनच्या मालाडमधील घरी दि. ८ जून २०२० ला पार्टी सुरु होती. दिशाचा होणारा पती रोहन राय आणि जवळची मंडळी या पार्टीत उपस्थित होती. थोड्याच वेळात अचानक या ठिकाणी आलेल्या हायप्रोफाईल व्यक्तींमुळे वातावरण बदलले, असा दावा करण्यात येत आहे. या हायप्रोफाईल व्यक्तींमध्ये तत्कालिन मंत्री आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांचा समावेश होता, असे सांगितले जाते. दिशावर अमानुष सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीतून समोर आल्या आहेत.
तोंड बंद करण्यासाठी हत्या..
दिशासमोर पूर्वी झालेल्या एका प्रकरणात दिशाचे तोंड बंद करण्यासाठी तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्यामुळेच आदित्य ठाकरेंचे या प्रकरणाशी कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे.
पाच वर्षे बदनामीचा कट : आदित्य
गेली पाच वर्षे आपल्या बदनामीचा कट आखला जात आहे, असा आरोप आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली.
विधिमंडळात हमरी तुमरी..
या प्रकरणावरून विधिमंडळात आज हमरी-तुमरी झाली. सत्ताधारी बाकांवरून प्रवीण दरेकर, संजय शिरसाट, चित्रा वाघ आणि मनीषा कायंदे यांनी प्रचंड आरोप केले. तर विरोधी बाकांवरून अनिल परब, अंबादास दानवे यांनी प्रत्यारोप केले.
दिशाच्या वडिलांचे आणि वकिलांचे गंभीर आरोप..
दिशा सालियनचे वडील सतीश आणि वकील ॲड. नीलेश ओझा यांनी अतिशय गंभीर आरोप केले असून त्याचे भक्कम डिजिटल पुरावे असल्याचे म्हटले आहे. ही घटना घडली त्यावेळी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया आणि रोहन राय यांच्या मोबाईलचे लोकेशन, तेथील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यास खुनाचा उलगडा होईल,असे त्यांचे म्हणणे आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिचे तोंड बंद करण्यासाठी गळा दाबून खून केला आणि इमारतीवरून उडी मारण्याचे भासवून मृतदेह खाली आणून ठेवला. पण, कोठेही रक्ताचे व्रण सापडले नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.