चऱ्होली टीपी स्कीम रद्द करून तातडीने नोटिफिकेशन काढा; एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्र्यांचे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला आदेश

शिवसैनिकांचे शिष्टमंडळ एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर तात्काळ कार्यवाही; भूमिपुत्र, शेतकऱ्यांना दिलासा
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मौजे चऱ्होली येथे प्रस्तावित केलेली TP Scheme तातडीने रद्द करण्यात यावी. यासाठी प्रशाससनाने केवळ घोषणा न करता तातडीने सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवून TP Scheme रद्द करण्याच्या ठरावाला मंजुरी देऊन ‘नोटिफिफकेशन’ काढण्यात यावे. असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाला दिले.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मौजे चिखली आणि चऱ्होलीसह शहरातील काही गावांमध्ये TP Scheme राबवण्याची योजना आखली होती. स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिकांना विश्वासात न घेता ही Scheme लादण्याचा प्रयत्न सुरू होता. या TP Scheme ला तीव्र विरोध करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुलभा उबाळे, चऱ्होलीचे भूमिपुत्र शिवसेनेचे पदाधिकारी ॲड. कुणाल महाराज तापकीर यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. येथील स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी या सर्वांचा नवीन नगर योजनेला विरोध आहे. त्यामुळे टीपी स्कीम रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
हेही वाचा : शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे; उपमुख्यमंत्री अजित पवार
यावेळी सुलभा उबाळे यांनी टीपी स्कीमला होत असलेल्या विरोधाबाबत पार्श्वभूमी स्पष्ट केली त्या म्हणाल्या , एमआयडीसीए, त्यानंतर नवनगर प्राधिकरण आणि महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतरही विविध आरक्षणांसाठी शेतकऱ्यांच्या जमीनी घेतल्या गेल्या आहेत. आता TP Scheme च्या माध्यातून शेतकरी भूमिहीन होतील. त्यामुळे TP Scheme ला आमचा सर्वांचा तीव्र विरोध आहे. तसेच, संपूर्ण शहराचा सुधारित विकास आराखडा (DP) तयार होत असताना TP Scheme गरजेची नाही अशी भूमिका स्पष्ट केली ग्रामस्थांनी देखील आपल्या भावना सांगितले.
सुसंगत भूमिका ठेवा
ग्रामस्थ तसेच शिवसैनिकांची भावना, भूमिपुत्रांचे होणारे नुकसान लक्षात घेता पिंपरी चिंचवड महापालिकेने गरजेचे नसताना नवीन नगर योजना राबवू असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शहर विकास साधताना सुसंगत भूमिका असणे महत्त्वाचे आहे. असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे यामुळे आम्हाला एक प्रकारे दिलासा मिळाला असल्याचे ॲड कुणाल महाराज तापकीर म्हणाले.