Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्ते, पूल बांधकाम कामे तात्काळ पूर्ण करा’; शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई :  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते व पुल पावसाळ्यात वाहतुकीकरीता सुस्थितीत ठेवण्यासाठी दक्षता घेणेबाबतचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज दिले. मंत्रालयात आज पावसाळापूर्व तयारी विषयी बैठक झाली. त्यावेळी मंत्री भोसले बोलत होते.

राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊन रस्ते काही प्रमाणात नादुरुस्त होतात असे यापूर्वी निदर्शनास आले असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, नागरिकाची गैरसोय होऊ नये या साठी खडेमुक्त रस्ते ठेवण्यासाठी विभागाने दक्षता घ्यावी आश्या सुचना यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिल्या.

यावेळी या बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सदाशिव साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे ) संजय दशपुते सहसचिव रोहिणी भालेकर ,उपसचिव निरंजन तेलंग,संजय देगावकर सचिन चिवटे तसेच दुरदृश्य प्रणालीव्दारे सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रादेशिक मुख्य अभियंते तसेच जिल्हाचे अधिक्षक अभियंते उपास्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रसिहराजे भोंसले म्हणाले की सा.बां. विभागाच्या अखत्यारीतील सर्व रस्त्यांवरील तसेच खाजगीकरणांतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या रस्त्यांवरील खड्डे वेळोवेळी भरून रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत राहतील याची दक्षता घेण्यात यावी.तसेच मुख्य अभियंता यांनी रस्त्यांवरील माहिती फलकांच्या गॅट्रीजची व पादचारी पुलांची ची तपासणी करून घ्यावे व खराब झालेल्या Gantries व FOBs काढून टाकण्यात यावेत.

सर्वसाधारणपणे सदर Gantries चे संकल्पन वायुवेग १८० प्रतितास गृहीत धरुन तपासण्यात यावे.तसेच रस्त्यालगतचे जाहिरात फलक व माहिती फलक तपासण्यात यावे व खराब झालेले जाहिरात फलक/माहिती फलक काढून टाकण्यात यावेत. सर्व घाट रस्त्यांची तपासणी करून ते खड्डेमुक्त तसेच सुरक्षित राहतील याची विशेष खबरदारी घेण्यात यावी. तसेच रस्त्यांवरील माहितीफलक वाचण्यायोग्य राहतील, तसेच रस्त्यावरील पट्टे मार्कीग्ज, Blinkers वाहन चालकास दृश्यमान राहतोल याची दक्षता घ्यावी.

हेही वाचा –  पुण्याच्या पीएमपीच्या मुख्यालयाच्या जागेत महामेट्रोचेही ‘हब सेंटर’

पुढे ते म्हणाले की पावसाळयापूर्वी कार्यकारी अभियंता यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांची पाहणी करून पावसाळयातरस्ते खड्डे मुक्त व वाहतुकीस सुरळीत राहतील याबाबत नियोजन करावे.याचबरोबर पावसाळयात रस्त्याचे काम सुरू असल्यास काम सुरू असल्याबाबत माहिती फलक लावणे, barricading करणे reflectors लावणे, इ. बाबीची विशेष दक्षता घेण्यात यावी.

घाट रस्त्यांची पाहणी करून loose rocks काढून घ्यावे. ज्या ठिकाणी दरड कोसळून रस्ता बंद होऊ शकतो अशा ठिकाणी रस्ते वाहतुक पुर्वस्थित करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात यावे. तसेच पर्यायो रस्तेही सुस्थितीत ठेवण्यात यावेत. घाट रस्त्यांमध्ये ज्या ठिकाणी पावसाळयात तात्पुरते धबधबे तयार होतात त्या ठिकाणी पर्यटक थांबणार नाहीत, वाहने उभी करणार नाही याची दक्षता घ्यावी; No Parking”, “थांबू नये” अशा आशयाचे फलक अशा ठिकाणी लावण्यात यावे . जिल्हास्तरावर वाररुम तयार करून आपत्तीच्या वेळेस टोल फ्री नंबर कार्यान्वित करावा.

तसेच आपल्या अखत्यारीतील सर्व क्षेत्रिय अभियत्यांना यासाठी आवश्यक नियोजन करुन सतर्क राहण्याबाबत मुख्य अभियंता यांनी सूचना द्याव्यात व या बाबतीत काळजीपूर्वक कार्यवाही न करणा-या अधिका-यांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असा ही ईशारा या वेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिला.

दरवर्षी पाण्याखाली जाणारे पूल, मो-या या ठिकाणी सावधानतेचा इशारा देणारे फलक लावण्यात येत आहेत. ज्या पुलांची दुरुस्ती अथवा नवीन बांधकाम चालू आहे त्याठिकाणी असलेले diversion पक्के करणे आदी सुचना यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिल्या.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button