पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट… फडणवीसांनी काय केली मोठी मागणी? शेतकर्यांना काय होणार फायदा?

Devendra Fadnavis Meets PM Modi: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विकासावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही फडणवीसांनी पंतप्रधानांना दिल्याची माहिती फडणवीस यांनी ट्वीट करून दिली. सध्या राज्याचे तीनही शिलेदार दिल्लीत तळ ठोकून आहेत. काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. कांदा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
“आमचे नेते आणि देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध विषयांवर त्यांचे मार्गदर्शन प्राप्त केले. महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि अभियानांची माहितीही त्यांना यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि मार्गदर्शन हे नेहमीच सकारात्मक ऊर्जा देणारे असते. त्यांचे अतिशय मनःपूर्वक आभार.” असे ट्वीट एक्स हँडलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
हेही वाचा – खासगी कर्जबाजारावर जेएम फायनान्शियलची नजर; १,००० कोटींचा नवा एआयएफ
राज्यात कांदा प्रश्न चिघळला आहे. शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले तर दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा नाराज आहेत. अनेक साखर कारखान्यांनी सध्याच्या काही धोरणांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या जागा वाटपावरून तीनही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा सुरू आहे. राज्यात एकूणच अनेक घडामोडी घडत आहेत.
राज्यातील काही प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यासह काही मंत्री काल दिल्लीत पोहचले. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीत कांदा आणि ऊस या प्रमुख पिकांचा खरेदी दर, निर्यात बंदी आणि इतर मुद्यांवर चर्चा झाली. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या मागण्यांविषयी अनुकूल असल्याचे समोर आले आहे. येत्या दहा दिवसात याविषयीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.





