Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्याच्या पीएमपीच्या मुख्यालयाच्या जागेत महामेट्रोचेही ‘हब सेंटर’

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) स्वारगेट येथील मुख्यालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी पीएमपीचे कार्यालय आणि महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनचे (महामेट्रो) एकत्रित वाहतूक केंद्र (हब सेंटर) उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महामेट्रो आणि पीएमपी प्रशासनाकडून सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात आला आहे.

या आराखड्यामध्ये प्रवाशांसाठी वातानुकूलित प्रतीक्षाकक्ष, आसन व्यवस्था, ऑनलाइन तिकीट व्यवस्था, बस संचलनासाठी जागा, वाहनतळ, खाद्यपदार्थ आणि वस्तू विक्री केंद्र आदींचा समावेश असणार आहे. या ठिकाणी पीएमपीच्या कार्यालयाबरोबरच बस दुरुस्तीचे मुख्यालय स्थलांतरित केले जाणार आहे.

हेही वाचा –  पुण्यातील कोरोना रुग्णाची प्रकृती ठणठणीत; रुग्णालयाकडून डिस्चार्ज, नवा व्हेरियंंट सौम्य स्वरुपाचा: वैद्यकीय तज्ञांचे मत

या नवीन हब सेंटरसाठी स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्यालयाची इमारत पाडण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत मुख्यालय तात्पुरत्या जागेत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पीएमपी आणि महामेट्रो यांच्यात करार करून साडेतीन एकर जागेत मुख्यालय आणि अत्याधुनिक बस स्थानक उभारण्यात येणार आहे. याबाबत साडेचार टक्के खर्चाचे शुल्क पीएमपी देण्यास तयार आहे.

दीपा मुधोळ-मुंडे,व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष, पीएमपीएमएल

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button