Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय
भाजपने तारखा देणं बंद करावे- खासदार संजय राऊत
नवी दिल्ली |
महाविकासआघाडी भक्कम आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेन. त्यामुळे महाविकासआघाडीची चिंता भाजपने करु नये. तसेच भाजपने तारखा देणे बंद करावे, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी त्यांनी विरोधी पक्षाने विधिमंडळात चांगले काम केले असे कौतुकही केले. महाविकासआघाडी हा महासिनेमा आहे. त्यात विविध पात्रे आहेत. तसेच विरोधातही अशी अनेक पात्रे आहेत. कधी कधी नायकासोबत खलनायकही सिनेमात महत्त्वाची भूमिका पार पाडतो, असे संजय राऊत म्हणाले आहेत.





