ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘तरुण भारत संवाद’ चे विश्वास दिवे यांना उत्कृष्ट उपसंपादक पुरस्कार!

कोल्हापूर प्रेस क्लबच्या पुरस्कारांचे वितरण उत्साहात

मंत्री हसन मुश्रीफ, आमदार बंटी पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

कोल्हापूर । प्रतिनिधी

कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने २०२४ आणि २०२५ या वर्षातील पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

दसरा चौकातील शहाजी छत्रपती महाविद्यालयातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या सोहळ्यात तरुण भारत संवादचे विश्वास दिवे यांना उत्कृष्ट उपसंपादक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच पोपट पवार, आदित्य वेल्हाळ, शेखर पाटील, सचिन सावंत, नयन यादवाड, राजकुमार चौगुले, राहुल गायकवाड, पांडुरंग पाटील, विकास पाटील आणि महेश कांबळे यांनाही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

हेही वाचा

“विजय सरकार कधीही कोसळू शकतं, मध्यावधी निवडणुकांसाठी सज्ज राहा”; एम. के. स्टालिन यांचं मोठं वक्तव्य

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ओतारी लिखित पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. परीक्षक संजय पाटोळे, कृष्णात जमदाडे, सचिन आडसूळ, अलोक जत्राटकर, संजीव देवरूखकर आणि सुरेंद्र जैन यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, सुरेंद्र जैन, प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर, कार्याध्यक्ष दिलीप भिसे, खजिनदार दीपक घाटगे, सहसचिव संग्राम काटकर, संचालक राहुल बामणे, दीपक जाधव, माहिती उपसंचालक प्रवीण टाके, जयेश ओसवाल, प्रा. महादेव नरके, रवि जाधव, राहुल चिकोडे, रूपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी प्रास्ताविक केले. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले, तर सचिव बाबुराव रानगे यांनी आभार मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button