Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘पंकजांचा पराभव धनंजय मुंडेंनी केला की…’, अजित पवारांचे वक्तव्य

मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणावरून जुंपल्याचे पाहायला मिळाले. भाजप नेत्यांकडून सातत्याने राष्ट्रपती राजवट लाववी अशी मागणी करणार असल्याची वक्तव्य यावेळी करण्यात आली. या वक्तव्यांचा समाचार घेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पंकजा मुंडेंच्या पराभवाविषयी देखील सूचक वक्तव्य केले

वाचा :-भाजपने तारखा देणं बंद करावे- खासदार संजय राऊत

अधिवेशन सुरू झाल्यापासून सुधीर मुनगंटीवार हे सरकार पडणार, सरकार बरखास्त होणार, राष्ट्रपती राजवट लागू होणार आहे, अशी विधानं केली आहे. मराठी मध्ये एक म्हण आहे ‘सहन ही होत नाही, सांगता ही येत नाही’ काही जणांना आपण या सरकारमध्ये नाही याचे शल्य प्रचंड बोचत आहे, असा जोरदार टोला अजित पवारांनी मुनगंटीवार आणि फडणवीसांना लगावला.

तुम्ही फार डोळ्यावर यायला लागले की बाजूला केलं जातं. एकनाथ खडसे यांच्या बाबतीत सर्वांना माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील अनेकांना तिकिटं नाकारण्यात आली, असे म्हणत अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.

धनंजय मुंडे परळी मतदार संघातून विजयी झाले तिथे त्यांचा (पंकजा मुंडे) पराभव झाला. त्यांचा पराभव धनंजय यांच्यामुळे झाला की दुसऱ्या कुणामुळे झाले हे काही माहिती नाही, असे सूचक वक्तव्य अजितदादांनी यावेळी केले. काही जणांना तिकीट देतो असं सांगून बायकोला तिकीट भरायला लावले आणि बायकोचे तिकीट नाकारले आणि त्यालाही तिकीट मिळाले नाही, असा जोरदार टोला देखील त्यांनी भाजप नेत्यांना लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button