Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

बनावट देशी दारू साठ्यावर कारवाई; ५१.३२ लाखाचा मुद्देमाल जप्त

मुंबई | ए. के. इलेक्ट्रीकल्स समोर, मुंब्रा-पनवेल रोड, मुंद्रा, शिळफाटा (ता. जि. ठाणे) येथे बेकायदेशीररित्या बनावट देशी दारुचा साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने ५ जून रोजी कारवाई केली. या कारवाईत एकूण ५१ लाख ३२ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मुंब्रा-पनवेल रोड, मुंब्रा, शिळफाटा या परिसरातून गोवा राज्यातील बनावट देशी दारुची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावरुन निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या टीमने सापळा रचत चॉकलेटी रंगाचा आयशर कंपनीच्या क्र. जीजे-०६-बीव्ही-५८२२ या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गोवा राज्यातील बनावट देशी दारुचे ९० मिलीचे १२१ बॉक्स व १८० मिलीचे ७२९ बॉक्स जप्त केले. यामध्ये आरोपी लक्ष्मण सिंह नाथू सिंह राठोड, वय ३७ वर्षे, रा. बस्सी, ता. सलुंबर, जि. उदयपुर (राजस्थान) यास अटक करुन परराज्यातील बनावट देशी दारु वाहतुकीसाठी वापरलेला चॉकलेटी रंगाचा आयशर कंपनीच्या वाहनासह गोवा राज्यातील बनावट देशी दारुचे एकूण ८५० बॉक्स, एक मोबाईल व एका वाहनासह अंदाजे किंमत ५१,३२,९४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा   :    GST स्लॅब 4 वरून 3 वर, 12% करसवलतीनंतर काय स्वस्त, काय महाग? 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनात सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त प्रदीप पवार, ठाणे अधीक्षक प्रविण तांबे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक श्री. यादव, रिंकेश दांगट, व्हि. व्हि. सकपाळ, सहा. दुय्यम निरीक्षक महावीर कोळेकर, तसेच जवान श्रीराम राठोड, हनुमंत गाढवे, अमीत सानप, कुणाल तडवी, हर्षल खरबस यांनी यशस्वीरित्या पार पाडली. दुय्यम निरीक्षक एच. बी. यादव हे पुढील तपास करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button