GST स्लॅब 4 वरून 3 वर, 12% करसवलतीनंतर काय स्वस्त, काय महाग?

GST Slab Rates | जुलै महिन्यामध्ये केंद्राच्या जीएसटी समितीची पुढील बैठक पार पडणार असून त्या बैठकीमध्ये केंद्रीय समिती मोठा निर्णय घेणार असून त्यातील एक स्लॅब रद्द करण्याचा विचार केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सध्या समितीकडून 12 टक्के जीएसटी हटवण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला जात आहे.
रद्द केल्या जाणाऱ्या स्लॅबमध्ये कशाचा समावेश? देशात आताच्या घडीला गरजेच्या वस्तूंवर तुलनेनं कमी कर आणि चैनीच्या वस्तूंवर अधिक कर आकारला जात आहे. ज्यामध्ये पाकिटबंद नसलेले खाद्यपदार्थ, मीठ, दूध, ताज्या भाज्या, शिक्षण आणि आरोग्य सुविधांवर कोणताही कर आकारला जात नाही.
हेही वाचा : किल्ले रायगडावर अवतरला शिवकाळ; शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा
कोणत्या गोष्टींवर 12% जीएसटी?
फुल क्रीम्ड मिल्क/ दूध, 20 लीटरचं बाटलीबंद पिण्याचं पाणी वॉकी- टॉकी, टँक, कान्टॅक्ट लेन्स, पनीर, खजूर, सुकामेवा, सॉस पास्ता, जॅम, जेली, फळांच्या रसापासून तयार करण्यात येणारी पेय, नमकीन, दंतमंजन पावडर, फिडिंग बॉटल, छत्री, टोपी, क्रेयॉन, ज्यूटच्या बॅगा, 1000 रुपयांहून कमी किमतीचे बूट, डायग्नोस्टिक किट, संगमरवर, ग्रेनाईट ब्लॉक.
जीएसटी समितीच्या बैठकीमध्ये जर 12 टक्के कर रद्द करण्याता निर्णय घेण्यात आला, तर या श्रेणीत येणाऱ्या वस्तूंना 5 आणि 18 टक्के कराच्या श्रेणीत समाविष्ट केलं जाईल. यामध्ये 5% जीएसटीच्या श्रेणीत मसाले, केरोसिन यांचा समावेश असण्याचे संकेत आहेत. तर, 18% च्या श्रेणीत डिटर्जंट, प्लास्टीक सामानाचा समावेश असेल.