Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशी-चिखलीच्या पाणीटंचाईवर सोसायटीधारकांचा एल्गार

जलसाठा प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेचा पाठपुरावा

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या वतीने मोशी–चिखली परिसरातील तीव्र पाणीटंचाई, कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, दूषित पाणी आणि टँकरमाफियामुळे नागरिकांवर पडणारा आर्थिक भार या गंभीर प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांची भेट घेतली.

संघटनेच्या वतीने चिखली येथील श्रीराम चौक परिसरातील बालाजी रामजी आल्हाट मैदानाच्या अल्प जागेत मोठी जलसाठा टाकी / रिझर्व्हॉयर उभारण्यात यावा, अशी ठाम आणि स्पष्ट मागणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे मोशी–चिखली परिसरातील हजारो कुटुंबांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार असून भविष्यातील वाढती लोकसंख्याही लक्षात घेऊन हा दूरदृष्टीचा निर्णय ठरेल, असे संघटनेने स्पष्ट केले.

या मागणीची दखल घेत महापौर रवी लांडगे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तसेच स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्यासोबत तातडीने चर्चा करून पुढील प्रशासकीय कार्यवाही गतीने करण्याचे आश्वासन त्यांनी पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा : मोशीतील साईनाथ हॉस्पिटलला डॉ. भीमराव आंबेडकर यांची सदिच्छा भेट;

याबाबत संघटनेच्या शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून तातडीने अभियंते पाठवून तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. जागा व प्रकल्प व्यवहार्य ठरल्यास या कायमस्वरूपी उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी निश्चित नियोजन करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चिखली मोशी परिसरातील पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटनेचे पदाधिकारी लवकरच आमदार महेश लांडगे यांची भेट घेऊन या प्रकल्पाला राजकीय व प्रशासकीय मान्यता मिळावी, तसेच महानगरपालिका अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, यासाठी सविस्तर चर्चा करणार आहेत.

या वेळी संघटनेचे अध्यक्ष सत्यव्रत त्रिपाठी, सचिव प्रकाश जुकंटवार, वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश उडाणे, वरिष्ठ उपाध्यक्ष धीरज सिंग, खजिनदार योगेश चौधरी, कमिटी सदस्य देवाशीष प्रधान, विजय पाणी, अविनाश खेरनार, प्रणव खेरनार आदी उपस्थित होते.

पाणी हा जनतेचा मूलभूत प्रश्न असून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही सातत्याने यासाठी पाठपुरावा करत आहोत. यामध्ये प्रभाग क्रमांक 2 च्या नगरसेविका व विधी समिती सभापती सुजाता निलेश बोराटे, नगरसेवक तथा माजी महापौर राहुल जाधव, नगरसेवक निखिल बोऱ्हाडे, सारिका नितीन बोऱ्हाडे यांनीही या विषयात लक्ष घालून पाठपुरावा सुरु केला आहे. मोशी–चिखली परिसरातील नागरिकांना दररोजच्या पाणीप्रश्नातून मुक्त करण्यासाठी हा जलसाठा प्रकल्प तातडीने मंजूर करून प्रत्यक्षात उतरवावा, ही संघटनेची स्पष्ट, ठाम आणि जनहिताची मागणी आहे.
– सत्यव्रत त्रिपाठी, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड-चाकण हाऊसिंग सोसायटी संघटना

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button