Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणे ते अयोध्या १५ विशेष ट्रेन सुरु होणार; कधी अन् केव्हा? जाणून घ्या सविस्तर…

पुणे | येत्या २२ जानेवारीला आयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर काही दिवसांत हे मंदिर सगळ्या रामभक्तांमना दर्शनासाठी खुलं करण्यात येणार आहे. त्यानंतर अयोध्येला जाणाऱ्या श्रीराम भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे ते अयोध्या विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. श्रीराम भक्तांसाठी पुण्यातून १५ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाने ३० जानेवारीपासून पुणे ते अयोध्येसाठी १५ विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. दर दोन दिवसांनी एक ट्रेन पुण्याहून अयोध्येसाठी निघणार आहे. या सर्व गाड्या स्लीपर कोच असणार आहेत.

हेही वाचा   –    ‘अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं’; रुपाली चाकणकर यांची भर भाषणात मागणी

एका गाडीतून सुमारे दीड हजार प्रवासी अयोध्येला जाऊ शकतील. लवकरच या गाड्यांचे बुकिंग सुरू होणार आहे. या गाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून विशेष गाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातून या ट्रेनच्या माध्यामातून लाखो लोक अयोध्येला जाऊ शकणार :

  • मुंबई – अयोध्या – मुंबई
  • नागपूर – अयोध्या – नागपूर
  • पुणे – अयोध्या – पुणे
  • वर्धा – अयोध्या – वर्धा
  • जालना – अयोध्या – जालना
  • गोवा – १ आस्था स्पेशल.
Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button