Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं’; रुपाली चाकणकर यांची भर भाषणात मागणी

मुंबई | राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने ‘निर्धार नारी शक्तीचा’या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी अजित पवार यांचे कौतुक करत अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीचा पुढील मुख्यमंत्री अजित पवार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, अजितदादा तुम्ही जो निर्णय घेतला, त्या निर्णया सोबत आम्ही सर्व महिला आहोत यासाठी हा मेळावा घेतला आहे. आज या मेळाव्यासाठी सर्व समाज घटकातून महिला आल्या आहेत. येणाऱ्या काळात तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषवावे ते देण्यासाठी ही महिला शक्ती असावी. राज्याचे नेतृत्व बदलण्याची ताकद या महिला शक्तीत आहे.

हेही वाचा    –    किर्तन परंपरेचे विद्रोपीकरण करू नका; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे आवाहन

महिला भावनिक असल्या तर त्या निर्णय कुठे घ्यायचा ते विचारपूर्वक घेतात. आता पहिल्यासारख राहिलेले नाही. आपल्यासाठी कोण विचार करत हे त्यांना कळते. आणि म्हणूनच या महिला आज या मेळाव्याला आल्या आहेत. तुम्ही नागपूरच्या कार्यक्रमाला आला होतात. या कार्यक्रमात आम्हाला निधी देणार असल्याचे सांगितले होते, आता राज्यातील महिला अर्ध्या तिकिटात महाराष्ट्रात प्रवास करतात. सध्या राष्ट्रवादीला मान मिळतोय. महिला धोरणाच्या निमित्ताने तुम्ही महिलांना मान दिला आहे, कवच दिले आहे, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button