सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण राज्यपालांच्या भेटीला, काँग्रेस नेते सोनिया गांधींचीही भेट घेणार
मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतलेली आहे. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राज्यपालांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर देखील या भेटीची माहिती देण्यात आलेली आहे. मात्र, त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचं म्हटलेलं आहे.
मागील काही दिवसांपासून महाविकासआघाडीत कुरबूर सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे. त्यातच काँग्रेसच्या नेत्यांच्या नाराजीचा मुद्दाही सातत्याने पुढे येत आहे. अशा परिस्थितीत अशोक चव्हाण यांनी राज्यपालांची घेतलेली भेट चर्चेला विषय ठरत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील काँग्रेस नेते दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीची भेट घेणार असल्याचीही माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे या भेटींमागे काय कारण याविषयी अनेक तर्क लावले जात आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/hRcBaLZ3Dm
— Governor of Maharashtra (@maha_governor) August 6, 2020





