Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

Good News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते महाराष्ट्रात गुगल क्लासरुमचं उद्घाटन, 2.3 कोटी विद्यार्थी-शिक्षकांना लाभ, देशातील पहिलं राज्य

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (6 ऑगस्ट) महाराष्ट्रात गुगल क्लासरुमचं उद्घाटन  करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र सरकार आणि गुगलच्या या भागीदारीमुळे राज्यातील जवळपास 2.3 कोटी विद्यार्थ्यी-शिक्षकांना याचा उपयोग होणार आहे. जी सूट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून शिक्षणाचं पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे. यावेळी त्यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केलेले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुगलसोबत भागीदारी केलेली आहे. या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली आहे. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने आत्मविश्वासाने एक पाऊल पुढे टाकताना विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले आहे. जी सूट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button