Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
नांगरलेल्या बोटीला ताडपत्री लावण्याचे काम सुरू

पालघर जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या सर्वाधिक बोटी सातपाटी बंदरामध्ये आहेत. या नैसर्गिक बंदरामध्ये सर्व बोटी दाखल झाल्या असून, या बोटी पावसाळ्यात सुरक्षित राहव्यात म्हणून त्यांच्यावर बांबूच्या आधाराने ताडपत्री बांधण्याचे काम जोमाने सुरू आहे. इतर वर्षी मासेमारी बंद झाल्यानंतर पाऊस सुरू होण्यास अवधी मिळत असतो, मात्र यंदा चक्रीवादळामुळे पाऊस लवकर येत असल्याने हे काम जलदगतीने करण्यासाठी मच्छीमार बांधवाची धावपळ सुरु आहे.





