breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दापोडीत अनधिकृत पत्राशेड आणि बांधकामांवर महापालिकेची कारवाई

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी आणि अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने दापोडी येथील अतिक्रमणीत बांधकामांवर मोठी कारवाई केली आहे. तब्बल 32 बांधकामे आणि पत्राशेड पाडण्यात आली आहेत.

उच्च न्यायालयाचे आदेश असताना केवळ महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामांचे पेव वाढत चालले आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्वाधिक अनधिकृत घरे बांधण्यावर नागरिकांचा जोर दिसत आहे. तरी, पालिका प्रशासनाचा हा विभाग अशा बांधकामांवर नियंत्रण मिळवायचे सोडून पत्राशेडवर कारवाई करत सुटला आहे. दापोडी येथील शितळादेवी चौकातील तब्बल 32 अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांवर आज या विभागाच्या कर्मचा-यांनी कारवाई केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button