breaking-newsपुणे

स्वारगेट परिसरात लाॅज छापा, तीन तरुणीची पोलिसांनी केली सुटका

पुणे – स्वारगेट परिसरातील एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्‍याव्यवसायाच्या ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी छापा घातला. पोलिसांनी तीन तरुणींची सुटका करून दोघांना अटक केली. अतीलखान साहेब खान (रा. पश्‍चिम बंगाल), अकीबुर नजरुल शेख (रा. बांग्लादेश) असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे यांच्या पथकास स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नटराज हॉटेलसमोरील लॉजवर वेश्‍याव्यवसाय सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी छापा टाकून तीन तरुणींची सुटका केली. खान व शेख यांच्याकडून तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्‍याव्यवसाय करून घेतला जात होता. त्यामुळे दोघांना अटक करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button